White फटकळ मी शपथेवर खरे सांगतो खोटे बोलत नाही... | मराठी शायरी आणि गझ

"White फटकळ मी शपथेवर खरे सांगतो खोटे बोलत नाही... विवंचना अन् दुःखाला माझ्या कुरवाळत नाही! जे जे आले नाहक टाळत मला तसेही त्यांच्या... शक्य तेवढे दूर राहतो मी कवटाळत नाही! मनात नाही भाव तरीही देव देव जो करतो... देवालाही माहित सारे उगाच पावत नाही! संदर्भासाठी पुराणातले नको दाखले हल्ली... जे घडते ते महाभयंकर पोथ्या चाळत नाही! नावडत्याला आवडते म्हणणे पटणारे नाही... थोडे फटकळ माझे असणे मी फेटाळत नाही! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade"

 White फटकळ

मी शपथेवर खरे सांगतो खोटे बोलत नाही...
विवंचना अन् दुःखाला माझ्या कुरवाळत नाही!

जे जे आले नाहक टाळत मला तसेही त्यांच्या...
शक्य तेवढे दूर राहतो मी कवटाळत नाही!

मनात नाही भाव तरीही देव देव जो करतो...
देवालाही माहित सारे उगाच पावत नाही!

संदर्भासाठी पुराणातले नको दाखले हल्ली...
जे घडते ते महाभयंकर पोथ्या चाळत नाही!

नावडत्याला आवडते म्हणणे पटणारे नाही...
थोडे फटकळ माझे असणे मी फेटाळत नाही!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade

White फटकळ मी शपथेवर खरे सांगतो खोटे बोलत नाही... विवंचना अन् दुःखाला माझ्या कुरवाळत नाही! जे जे आले नाहक टाळत मला तसेही त्यांच्या... शक्य तेवढे दूर राहतो मी कवटाळत नाही! मनात नाही भाव तरीही देव देव जो करतो... देवालाही माहित सारे उगाच पावत नाही! संदर्भासाठी पुराणातले नको दाखले हल्ली... जे घडते ते महाभयंकर पोथ्या चाळत नाही! नावडत्याला आवडते म्हणणे पटणारे नाही... थोडे फटकळ माझे असणे मी फेटाळत नाही! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade

#Smile

People who shared love close

More like this

Trending Topic