White हरलेली...
रुक्ष आयुष्य तसच वेशीवर टांगून
दूर धुक्यात नसलेला चेहरा शोधत चाचपडत मी
काही आसवं
म्हातारी जिर्ण पानगळी सारखी
काही आसवं
हिरवीगार पानापानात साठलेली मूक
पण काळजाला भिडणारी
वाटतंय
मी गरुडाचे पंख लावून उडतेय
कळतंय मला मी
हतबल फाटक्या कागदाला पंख समजून
खुल्या आभाळाचा आव आणत उडतेय...
जिंकल्याचा... आव....
खरचं
हरलेली मी...
-अमृता...
©Amruta
#sad_shayari