LOVE माझे शब्द ओळखतात
माझ्या मनातल्या भावनांना
भावना बनतात शब्द अन
शब्द बनतात भावना
त्याला जोड मिळते अर्थाची
मग बनते कविता प्रेमाची
तुझे प्रेम हृदयी साठवून
लिहीते मी कविता
तुझी प्रीती स्मरून
देते अर्थ त्याला
ओळख आपली पटते
मन ही जुळतात
तेव्हा अर्थ उमगतो
त्या शब्दांचा आपल्या कवितेचा
©dhanashri kaje
#love