राञ संपते.. सकाळी सकाळी
दिवस उजाडतो... सकाळी सकाळी
डोळे असतात झोपेतच
मग आई ओरडते... सकाळी सकाळी
आळस येतो... सकाळी सकाळी
पण उठावं लागतं... सकाळी सकाळी
शाळा, कॉलेज ऑफिसच्या निमित्त्याने
झोपेला विसरावं लागतं... सकाळी सकाळी
अपयश आठवतं... सकाळी सकाळी
आत्मविश्वास ही जागतो... सकाळी सकाळी
निराशेची राञ संपल्यावर
मग आशेचा किरण सापडतो... सकाळी सकाळी
स्वप्न पडतात... सकाळी सकाळी
उगाच खरी वाटतात... सकाळी सकाळी
मिटल्या डोळ्यांना 'तू' दिसतो जवळ
अरेरे.. लगेच डोळे उघडतात ...सकाळी सकाळी
कित्येक राञी आठवणी खोडण्यात गेल्या,
तरी त्या पुन्हा आठवतात... सकाळी सकाळी
'तुझ्य' आठवणीत राञी जागतांना
डोळे सुजतात... सकाळी सकाळी
पण काय, 'तू' म्हणजे एक राञीचं गोड स्वप्न समजून
दिवसाची नविन सुरवात करावी लागते... सकाळी सकाळी
विरहाचे गाणे गात राञ सरते...
मग दिवस नाचतो.... सकाळी सकाळी
तू पुन्हा दिसतो... सकाळी सकाळी
मी पुन्हा तुझ्यात अडकते... सकाळी सकाळी
उफ्फफ हे... सकाळी सकाळी
सकाळी - सकाळी