नशीब
कोणाला आहे ठावे नशिबात काय असत.
बघ तुझ्या अंतरमनात झाकून हे,जिवन कसं असत.
दाखवू नकोस हात कोणाला बघू नकोस तू भविष्य,
बघ तुच तुझे दैव-हेच आपल्या हाती असतं.
जे करतात वाईट काम त्याचे त्याला लगेच फळ मिळते.
चांगले करायचे अथवा वाईट काम
येवढेच आपल्या हाती असते.
हे ठेव मनी तुझ्या सगळे सुखी असावे.
कर स्वप्न साकार तुझे,हेच मनी ठसावे.
जे पेरशील आज,उगवेल उद्या ते
परिसाहून मोठी जादू तुझ्या हाती आहे रे
स्पर्शाने तुझ्या मातीला सोने व्हावेच लागेल
ध्येया पुढे तुझ्या आकाशाला ही झुकावेच लागेल
ना दोष देवू कोणाला
विचार स्वत:च्याच मनाला
आपले नशिब असते आपल्या हाती
बळ आहे मनगटात तुझ्या सामर्थ्यवान हो आधी
हर्ट ब्रोकन डायरी
प्रदिप वाघमारे
हर्थ ब्रोकन डायरी
प्रदिप वाघमारे