Nature Quotes तो आणि त्याच्या मनाची घालमेल.. तिच्यापर्यंत पोहोचलीच नसेल का गडे🤔 तिला कळतच नसतील का त्याच्या हृदयाला होणाऱ्या अतोनात वेदना.. तिला उमजतच नसेल का विरहात होणारी त्याची परवड... सोबत चालताना एका हाताचं अंतर कायम राखत चालणं म्हणजे त्याच्यासाठी अग्निदिव्य असणार याचंही भान नसणार का तिला... तिनं जवळ येत असताना याचं दूर सरकणं, सोबत चालताना पुन्हा पुन्हा थांबणं, चालताना ही तिच्याच कडे पाहणं, तू बोलून दाखवतेस तसं नाही गं जमत मला बोलायला असं सांगत राहणं, त्याचं तू सांग ना माझं काय चुकलंय म्हणत स्वतःच्याच चुका शोधणं, स्वतःच हसत-हसत Breakup म्हणुन स्वतःच शुन्यात हरवणं, मला नाहीत सहन होत तुझे Mood Swings म्हणत तिचं सगळं काही ऐकून घेणं, आणखीही बरंच काही......
त्याच्या श्वासातले बदलही लक्षात येतील इतक्या जवळ असताना तिला त्याच्या हॄदयाचा ठाव लागू नये इतकीही 'ढ' ती नक्कीच नाही. पण, मग का वागत असावी ती अशी की त्याला प्रेमाने जवळ न घेता कायम त्याला दूर लोटण्याचे बहाने शोधत असते ती, का त्याला बोलताना त्याला Hurt होतील अशाच गोष्टी पुन्हा पुन्हा का बोलत असते ती,,
का त्याच्या सोबत असताना देहभान विसरूनही काही गोष्टी कायम टाळत असते ती,.....
एक ना अनेक कारणं काढून त्याच्यापासुन दूर पळणारी ती आणि एक ना अनेक कारणं टाळून तिच्यासाठी झुरणारा तो..
इतनी Complicated Love Story पे तो Movie बननी चाहिए यार। और इसी बात पे याद आया...
"हमारी जिंदगी भी फिल्मों की तरह होती है, आखिर में सबकुछ ठीक हो ही जाता है.. तो दोस्तों, अगर कुछ ठीक नही है तो वो The End नहीं है.. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त."🫶🏻
©Shilpa ek Shaayaraa
#NatureQuotes
#Alikhit #30thJan2024 #जान_है_जनवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358