झेप....🕊️🕊️🕊️🕊️🕊️
आकाशात उंच उडावेस तू होऊन पक्षी,
पाखरा सारखी घे भरारी नभ तारे सारे साक्षी.
परत कधी मागे वळून पाहू नकोस,
येतील अंधार दाटूनी हताश तू होऊ नकोस.
प्रगतीची पावले तुझी उमटतील,
कर्तुत्वाच्या कौतुकाचे स्वागत सारे करतील.
सारे जग उभे असेल तुझ्या नेहमी पाठीशी,
लहान परी हरवू नकोस मात्र तूझ्यातली ती बाळग उराशी.
सफलता अशी मिळावी असेल उत्तुंग भरारी ती गगनाची,
प्रत्येक घरात जसे आहे महत्त्व धागे दोरे अन् सुईची.
तू परतावीस होऊनी तंत्र विज्ञानामधील विरांगणा,
तूच व्हावीस सर्व मुलींच्या कल्पनेतील कल्पना.
एक दिवस तुझ्या प्रयत्नांना मिळेल असे यश,
दिव्यांनी ही उजळून निघेल तुझ्या सामर्थ्याचे लक्ष.
झेप अशी असेल तुझी आकाशी सारेच चकित होऊन जातील,
कष्ट जिद्दआणि चिकाटीची कथा होऊनी पुढे ते गुणगुणतच राहतील
©Mayuri Bhosale
#झेप