माणसाचं मन विशाल सागरासारखं असते. त्याचं त्याचं साचणं असतं, त्याचं त्याचं घुटमळणं असतं, त्याची त्याची वादळं असतात, त्याची त्याची भरती-ओहोटी असते, त्याचा त्याचा विस्तार असतो, त्याची त्याची खोली असते. त्याच्याही खोलवर अंधार असतो, त्याचं भरकटणं असतं तर त्याचा किनारा असतो. त्याची त्याची निळाईही असते, त्याच चमकणंही असतं, त्याचं सामावून घेणंही असतं, त्याच दूर लोटणंही असतं, त्याचे त्याचे शंख, शिंपले आणि मोतीसुद्धा असतात.
वसुंधरा जाधव
©Vasundhara Jadhav
#वसु# मी समुद्र