जन्माला आली आणि परक्याची धन झाली.
जन्माला आली बापाच्या घरी,
मरण पावणार पतीच्या घरी.
असा कोणता उंबरठा आहे ज्या घरची तूच मालकीण खरी.
परक्याच धन म्हणता म्हणता आपलेच परक्यासारख वागवतात,
सासरी जाऊन तर परके सासरपणाला जागतात.
मिळून-मिसळून राहावं ही शिकवण देतात बरी,
पण असा कोणता उंबरठा आहे ज्या घरची तूच मालकीण खरी.
मुले,घरकाम, नोकरी शिवाय आजकाल संसारच धकत नाही,
कौतुकाचे दोन बोल नवरासुद्धा बोलत नाही.
कितीही त्रास झाला तरी, गप्पच बसावं लागत,
कारण म्हणतात ना..
सासरी जाताना तोंड शिवून जावं लागतं.
कारण प्रत्येक वादाला शेवट असतो-जा बाई तुझा बापाच्या घरी.....
असा कोणता उंबरठा आहे ज्या घरची तूच मालकीण खरी.
कधी मिळणार प्रत्येक स्री ला तिच्या हक्काचं घर, ज्यातली प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीनुसार होणार, कधी तिच्या आनंदाचं गाणं ती मोठ्या आवाजात गाणार.
मोकळा श्वास घेत अभिमानाने जगू शकेल ती ज्या घरी त्याच घरची ती मालकीण खरी.
ऋतु 💕🕊️
#footsteps ती परक्याच धन