निष्पर्ण मी जाहलो आजजरी विहरले कैक इथल्या फांदीवरी | मराठी Video

"निष्पर्ण मी जाहलो आजजरी विहरले कैक इथल्या फांदीवरी घरटी बांधून संसार थाटला प्रेमाचा झरा नाही आटला विहंगणाऱ्या साऱ्यांचा साक्षी फांदीवर पक्ष्यांची सुबक नक्षी थबकून नेहमी मला पाहायचे सारे सोसाट्याचे वाहत असे जरी वारे अनेकांच्या आठवणींचा मी सोबती दूरदूरवर पसरे माझी ख्याती आताशा फिरकतही नाही कोणी पुरेसे नाही खत आणि पाणी भार सोसवत नाही फांद्यांचा वाट बघतो पानगळ होण्याचा नाही बहरलो कित्येक दिवसांत भिजायला नाही मिळत पावसात अश्रुंनाही वाट केली मोकळी पुढे भरुन निघेल का पोकळी आता दिवस उरलेत फक्त चार सुकलेल्याला पालवी कशी फुटणार ? ©Sujata Bhalerao "

निष्पर्ण मी जाहलो आजजरी विहरले कैक इथल्या फांदीवरी घरटी बांधून संसार थाटला प्रेमाचा झरा नाही आटला विहंगणाऱ्या साऱ्यांचा साक्षी फांदीवर पक्ष्यांची सुबक नक्षी थबकून नेहमी मला पाहायचे सारे सोसाट्याचे वाहत असे जरी वारे अनेकांच्या आठवणींचा मी सोबती दूरदूरवर पसरे माझी ख्याती आताशा फिरकतही नाही कोणी पुरेसे नाही खत आणि पाणी भार सोसवत नाही फांद्यांचा वाट बघतो पानगळ होण्याचा नाही बहरलो कित्येक दिवसांत भिजायला नाही मिळत पावसात अश्रुंनाही वाट केली मोकळी पुढे भरुन निघेल का पोकळी आता दिवस उरलेत फक्त चार सुकलेल्याला पालवी कशी फुटणार ? ©Sujata Bhalerao

#Sukha #जीवनगाणे# गातच राहावे

People who shared love close

More like this

Trending Topic