आसरा
भगवंत पाहिला डोळी तुझिया!
रुप तुझे ते नयनी बसले !
ह्दयी पान्हा फुटला!
भगवंत पाहिला डोळी तुझिया
घाम तो मज मेघ वाटला
पाय तुझा तो उन्हात झिझला
पदरी दिसे आसरा..!
भगवंत पाहिला मी
डोळी तुझिया.!
मान झुकली
हात जुडले
दंडवत मी घातला
भगवंत पाहिला
डोळी तुझिया...!
मोहन सोमलकर
#आसरा