आपल्या खरोखर श्रीमंत व्हायचे असेल तर
वास्तू नियम पाळा
घराला वास्तूप्रमाणे सजवा. क्रोध करू नये. व्यसनापासून दूर राहावे. बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे. देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धन वर्षा होत असलेलं चित्र लावावं. आहार ग्रहण करताना मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी. घरातील तिजोरीत तांबा, पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे. या व्यतिरिक्त हळदीची गाठ, पिवळ्या कौड्या, तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे. घरातील वातावरण सुगंधित असावे. उंबरठ्याची पूजा करावी. खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे. शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी.
©DJ song
#holihai #paisa#paisahipaisahoga #dhan#dhanvanm#marathivastu#vastushastra #marathitips