कस्तुरी मृग
एक चिमुकले मृग होते l
जग बघायला निघालेले ll
अल्लडपणे भटकत होते l
भान त्याचे हरपलेले ll१ll
एक अचानक सुगंध आला l
चित्त तयाचे मोहून टाकले ll
शोध सुगंधाचा करायला l
कुरंग रानोरानी फिरू लागले ll२ll
जिथे जिथे जाई कृष्णसार l
सुगंध अनंत दरवळत राही ll
काय करावे किती शोधावे l
त्याला काही कळत नाही ll३ll
राने झाली वने झाली l
झाल्या नद्या नदीकिनारा ll
टप्पा टप्पा शोधून काढला l
सुगंध शोध मात्र अपुरा ll४ll
वेळ गेली काळ गेला l
सुगंध शोधात झिजली काया ll
तरी उमगेना हरिणाला l
सुगंध मात्र तसाच्या तसा ll५ll
सर्व जग भटकुन झाले l
एकच ठिकाण निरखायचे होते ll
स्वतः डोकावून बघितले असते l
स्वतः एक कस्तुरीमृग होते ll६ll
त्या अद्भुत सुगंधाच्या शोधात l
सारंग आयुष्य वीरला ll
अफाट या नभात शेवटी l
सुगंध तसाच दरवळत राहिला ll७ll
©Geetanjali Karande
#कस्तुरी_मृग #मृग #कुरंग #सारंग #कस्तुरीमृग_निल #कस्तुरीचा #कस्तुरी_प्रेम
#मराठीकविता #मराठी