तुझ्या नसण्याने
हो सुचते मला कविता तुझ्या नसण्याने,
येतात विचार तुला आपलेसे करण्याचे,
पण नकळत मी भरकटुन जातो,भारावतो.
कारण तु वास्तवात नसून स्वप्नात असल्याने,
आज तुला पाहिलं नाही ,मन अगदी चल-विचल झालं,
रोजची ती तुला पाहण्याची सवय वेड लावून गेली.
माहीत नाही का पण खुप खास आहेस तू,
बघ ना एक दिवस नाहीस तर माझं हृदय निकामी केलंस तू,
हो पहिली वाट तुझी आजही कॉलेज च्या पायऱ्यांवर,
तू काही दिसली नाहीस मग मारला हात कपाळावर,
हो नाही मांडत तुझ्याकडे मी माझ्या हृदयाची व्यथा मनापासून,
कारण नकळत का होईना तू दुरावशील माझ्यापासून,
रोज विचार येतो की आजतरी तुझ्या समोर यावं, बोलावं,
पण लागतात या भावना कवितेतूनच मांडाव्या,
हो सुचते मला कविता तुझ्या नसण्याने,
कारण येतात विचार तुला आपलेसे करण्याचे..
तुझ्या नसण्याने