पहिला पाऊस अन् तू ...!
पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल...,
तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...!
त्या पाऊलखुणा,ती वाट अन् त्या वाटेवरचा तो जुना पूल...,
ते खळाळतं पाणी,ती गुलाबी हवा अन् ते गुलाबी रानफूल...!
सारा आसमंत, सारे जीव अन् ते सारं रान ओलेचिंब मश्गुल...,
बेधुंद, बेभान बरसणार्या पावसाला जणू माफ असते चूकभूल...!
पहिला पाऊस, तो पहिला शहारा अन् ते मनातले काहूर...,
पहिला पाऊस, पहिला थेंब अन् आजही तुझी आठवण येते जरूर...!
तुझी आठवण येते जरूर...!
-sj
©Santosh Jadhav
#rain पहिला पाऊस...!