विपरीत दिशा झिंगाट
स्वार्थात अंधबहिरे शासन उदार झाले,
सेवेकरी असोनी भरपूर पगार झाले!
शाळांकडे तयांची गेलीच काकदृष्टी,
त्या खाजगी कराया मंथन हजार झाले!
शाळा शिकून काही होणार लाभ नाही,
भावी पिढ्या धुळीला मिळवू करार झाले!
विद्यालये नकोशी मद्यालयात वृद्धी,
झिंगाटल्या मनाला नाना विकार झाले!
नेते मिळून सारे ढाब्यात भेटले अन्
वाढीव 'बार' देण्या सगळे तयार झाले!
षंढासमान सारे होती प्रकार येथे,
पाहून ही अवस्था काळीज गार झाले!
नेणार देश कोठे संस्कार संस्कृतीचा,
गोऱ्यापरीस काळे देशास भार झाले!
जयराम धोंगडे
©Jairam Dhongade
#WForWriters