White भ्रम
मी माझ्या स्वप्नांच्या
सावल्यांचा पाठलाग करतेय
मी धावतेय,
त्यांच्या जवळही जातेय
आणि पाहते
मी धावतेय,
कारण माझी स्वप्ने
झोत आहेत प्रकाशाचा
एकच पाऊल पुढे फक्त...
विचार असा करून
मी धावतेय,
कळतं नाही मला
पण,
मी पाठलाग का करतेय
जवळ जातेय जितकी
विरत जातेय सावली तितकी
विरलेल्या प्रकाश्याच्या
झोतात पुन्हा अडकायला
मी धावतेय भ्रमाच्या
भोवर्यात...
तुटलेल्या स्वप्नांच्या
जाळ्यात...
©Amruta
#Sad_Status मराठी कविता