White *आभाळ भरुन येतांना*
🌈⛈️🌈🌩️🌈🌨️🌈
पाहिलं होतं मी काल
आभाळ भरुन येतांना
अचानक गेली नजर
घरी ऑफिसमधून जातांना!
आलं होत भरुन आभाळ
तसं मनही भरुन आलं!
अचानक चिंब ओल्या सरीचं
जणु आभाळाने स्वप्न दाखविलं
रोज रोज असंच
आभाळ भरुन येतं
पाऊस काही पडेना
मन माझे मग रोज
हिरमुसलं होतं!
पावसा पावसा !
कधीतरी मनसोक्त पडशील का?
का फक्त असंच स्वप्न दाखवतं
एक एक दिवस काढशील का?
एक दिवस मोठा तु
खुप तुफान घेऊन बरसतो!
बिचारा बळीराजा
तुझ्यावर विश्वास ठेवून पेरणी करतो
फक्त खोटं स्वप्न तू
बळीराजाचा दाखवतो!
असाच दरवर्षी तु पावसा
नुसता टाईमपास करतो!
कित्येकदा पाहिलं मी
आभाळ भरुन येतांना!
नशीबाने मुसळधार पडला तु
पाहिलं मग मी डोळे भरुन येतांना!
मोहन सोमलकर नागपूर
©Mohan Somalkar
#good_night