लालपरीचा प्रवास गर्दीमधला प्रवास होता, | English Poetry

"लालपरीचा प्रवास गर्दीमधला प्रवास होता, जायचं की नाही प्रश्न मोठा? दिमाखात उभी लालपरी, वाटलं पोहचवेल का मला घरी ? सुरू झाला मग बसचा प्रवास, धो-धो पावसाचा वेगळाच त्रास. खिडकीतून आत पावसाच्या सरी, हळू-हळू चाले लालपरी. वळणा-वळणांचा रस्ता,रस्तामधील चढण, खिडकी बाहेरील निसर्गात अडकले मन. काय तो निसर्ग,काय ती झाडे सगळं डोळ्यात साठवून मी जाई पुढे . चालता चालता लालपरी मध्येच होई बंद, लागला होता तिलापण निसर्गाचा छंद. पुन्हा मग दिमाखात चाले लालपरी, घाटातून ती चालतांना वाटे खूप भारी . तिलाच माहीत रस्त्यावरील खड्डे किती खाली, तिलाच माहीत किती मैल धावून ती आली ! धावून-धावून शेवटी ती गाववेशीवर पोचली, बघून माझ्या गावाकडं स्वतःशीच ती हसली. अडथळ्यांना पार करून चाले लालपरी, छत गळत असून पण मला वाटली भारी . असा हा लालपरीतील आठवणींचा प्रवास, वाटला जरी त्रास ,तरी असतो मात्र खास ........ -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh"

 लालपरीचा प्रवास 

गर्दीमधला प्रवास होता,
                  जायचं की नाही प्रश्न मोठा?
 दिमाखात उभी लालपरी,
                   वाटलं पोहचवेल का मला घरी ?

   सुरू झाला मग बसचा प्रवास,
               धो-धो पावसाचा वेगळाच त्रास.
     खिडकीतून आत पावसाच्या सरी,
                 हळू-हळू चाले लालपरी.

            वळणा-वळणांचा रस्ता,रस्तामधील चढण,
                    खिडकी बाहेरील निसर्गात अडकले मन.
 काय तो निसर्ग,काय ती झाडे 
                       सगळं डोळ्यात साठवून मी जाई पुढे .

               चालता चालता लालपरी मध्येच होई बंद,
                      लागला होता तिलापण निसर्गाचा छंद.
           पुन्हा मग दिमाखात चाले लालपरी,
                          घाटातून ती चालतांना वाटे खूप भारी .

                   तिलाच माहीत रस्त्यावरील खड्डे किती खाली,
                        तिलाच माहीत किती मैल धावून ती आली !
                धावून-धावून शेवटी ती गाववेशीवर पोचली,
                           बघून माझ्या गावाकडं स्वतःशीच ती हसली.

          अडथळ्यांना पार करून चाले लालपरी,
                  छत गळत असून पण मला वाटली भारी .
असा हा लालपरीतील आठवणींचा प्रवास,
                   वाटला जरी त्रास ,तरी असतो मात्र खास ........
                                                       -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh

लालपरीचा प्रवास गर्दीमधला प्रवास होता, जायचं की नाही प्रश्न मोठा? दिमाखात उभी लालपरी, वाटलं पोहचवेल का मला घरी ? सुरू झाला मग बसचा प्रवास, धो-धो पावसाचा वेगळाच त्रास. खिडकीतून आत पावसाच्या सरी, हळू-हळू चाले लालपरी. वळणा-वळणांचा रस्ता,रस्तामधील चढण, खिडकी बाहेरील निसर्गात अडकले मन. काय तो निसर्ग,काय ती झाडे सगळं डोळ्यात साठवून मी जाई पुढे . चालता चालता लालपरी मध्येच होई बंद, लागला होता तिलापण निसर्गाचा छंद. पुन्हा मग दिमाखात चाले लालपरी, घाटातून ती चालतांना वाटे खूप भारी . तिलाच माहीत रस्त्यावरील खड्डे किती खाली, तिलाच माहीत किती मैल धावून ती आली ! धावून-धावून शेवटी ती गाववेशीवर पोचली, बघून माझ्या गावाकडं स्वतःशीच ती हसली. अडथळ्यांना पार करून चाले लालपरी, छत गळत असून पण मला वाटली भारी . असा हा लालपरीतील आठवणींचा प्रवास, वाटला जरी त्रास ,तरी असतो मात्र खास ........ -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh

#Lalpari
#Bus
#Travel
#Nature
#pravasi
#Life poetry poetry quotes Extraterrestrial life Hinduism love poetry for her

People who shared love close

More like this

Trending Topic