लालपरीचा प्रवास
गर्दीमधला प्रवास होता,
जायचं की नाही प्रश्न मोठा?
दिमाखात उभी लालपरी,
वाटलं पोहचवेल का मला घरी ?
सुरू झाला मग बसचा प्रवास,
धो-धो पावसाचा वेगळाच त्रास.
खिडकीतून आत पावसाच्या सरी,
हळू-हळू चाले लालपरी.
वळणा-वळणांचा रस्ता,रस्तामधील चढण,
खिडकी बाहेरील निसर्गात अडकले मन.
काय तो निसर्ग,काय ती झाडे
सगळं डोळ्यात साठवून मी जाई पुढे .
चालता चालता लालपरी मध्येच होई बंद,
लागला होता तिलापण निसर्गाचा छंद.
पुन्हा मग दिमाखात चाले लालपरी,
घाटातून ती चालतांना वाटे खूप भारी .
तिलाच माहीत रस्त्यावरील खड्डे किती खाली,
तिलाच माहीत किती मैल धावून ती आली !
धावून-धावून शेवटी ती गाववेशीवर पोचली,
बघून माझ्या गावाकडं स्वतःशीच ती हसली.
अडथळ्यांना पार करून चाले लालपरी,
छत गळत असून पण मला वाटली भारी .
असा हा लालपरीतील आठवणींचा प्रवास,
वाटला जरी त्रास ,तरी असतो मात्र खास ........
-हर्षल दत्तात्रय चौधरी
©Harsh
#Lalpari
#Bus
#Travel
#Nature
#pravasi
#Life poetry poetry quotes Extraterrestrial life Hinduism love poetry for her