🎊🎊 दिवाळी 🎊🎊
आली दिवाळी ,आली दिवाळी
रुचकर फराळांची, आली दिवाळी
कुरुकुर चकली ,खुदकन हसली
गोल गोल लाडू ,खाली नका पाडू
खमंग चिवडा, खावा तरी तो तेवढा
करंजी हसली अन् तेलात फसली
गोड गोड शंकरपाळी ,ओळीत थांबली
आली दिवाळी , आली दिवाळी
रुचकर फराळांची , आली दिवाळी
©Sudha Betageri
#Sudha