White सोनेरी विण, एका अनोखी प्रेमाची
भाऊबहिणीचे नाते
खुप खुप गोड आहे
म्हणूनच कुठल्याच
नात्यात नाही एवढी
या नात्यात ओढ आहे
एकतरी बहिण
भावाला असावी
तिच्या प्रेमाची ओढ
तिच्या नजरेत दिसावी
बालपणी खुप घेत असतो
भाऊ बहिणीची काळजी
तिच्यासाठी हृदयात ओढ
अन डोळ्यात माया खुजी!
भावबंधाचे हे नाते
अनोखी असते ह्याची विण!
जितका भाऊ लावतो माया
तितकीच माया लावते बहिण!
ज्याला नसते दुर्दैवाने बहिण
तो बहिणीच्या प्रेमाविना थिटा!
अन ज्याला असते बहिण
कधी कधी भाऊ ठरे खोटा!
अतुट धागा नात्याचा
तो आहे स्नेहबंधाचा
एक वादा मनात घेतला
बहिणीच्या रक्षणाचा!
मोहन सोमलकर नागपूर
©Mohan Somalkar
#raksha_bandhan_2024 #रक्षाबंधन