बाप्पा निरोप तुमचा घेता
साऱ्या विश्वाचा तु आमचा रक्षणकर्ता.
तुझ्या मुळेच जीवनात आनंदाची वार्ता.
बाप्पा तुझ्या चरणी ठेऊनिया माथा,
मन आले भरून निरोप तुझा घेता.
तूच आमचा गणपती, तूच आमचा गजानन,
तुझ्या भक्तीत देवा सदैव आमचे मन.
तूच चालक-तूच मालक तु विश्वाचा धनी,
निरोप घेता तुझा डोळ्यात आले पाणी.
वर्षातून एकदा तुमचे आमच्या घरी आगमन,
आमच्यासाठी बाप्पा हा आनंदाचा क्षण.
दुःख होतात नष्ट तुमच्या आगमनाने बाप्पा,
विसर्जनाच्या दिवशी आम्हा सोडून जाऊ नका.
कोणी म्हणतो वक्रतुंड,कोणी म्हणतो एकदंत,
आमच्या वरील विघ्नांचा करता तुम्ही अंत.
तुमच्या मुळेच बाप्पा जीवनात आमच्या चैतन्य,
तुमच्याविना बाप्पा जिवन आमचे शून्य.
आशीर्वाद द्यावा आम्हा तुम्ही जाता-जाता,
मन आले भरून निरोप तुमचा घेता,
निरोप तुमचा घेता........
हर्षल दत्तात्रय चौधरी.
©Harsh
#GaneshVisarjan
#ganapati
#GaneshChaturthi
#ganesha
#visarjan