मंत्रिपदाच्या चढा ओढीत गावच्या गुरा-ढोराकड थोड लक् | मराठी कविता Video

"मंत्रिपदाच्या चढा ओढीत गावच्या गुरा-ढोराकड थोड लक्ष राहुद्या.. स्वतःच घर भरण्यापेक्षा माणुसकीचा झरा वाईसा वाहुद्या.. दुष्काळाचे संकट डोकावता हवालदिल झाला माझा बळीराजा, अन्नदात्याचे रक्षण करण्या साथ सगळी देऊया.. खुर्चीसाठी भांडत बसण्यापेक्षा दुष्काळा वर थोड बोलूया.. असता मुबलक पाणी किंमत नाही मनी पाऊस पडता लांबणीवर तांडव राहतो कुनब्याच्या घरी.. ना कोणाचे ना कोणा पडले स्वतः च धोतर सावरून काई एक पसार झाले.. एकमेकांची जिरवण्यापेक्षा पाणी थोड जिरवूया.. आप्तजनात भांडत बसण्यापेक्षा .. दुष्काळावर थोड बोलूया.. दुष्काळावर मात करून मातीतून सोन पिकवल असत , अन् तिशी ओलांडलेल्या बंड्याच माझ्या दोनाच चार केलं असत.. शेतकरी म्हणून डावलेल्या पोरींना कष्टाच्या कमाई ने सोन्या चांदीने मढवल असत.. सुखाची पहाट बघण्यासाठी पाणी नियोजनाची गाठ बांधूया.. हे माझ्या सवंगड्यानो दुष्काळावर थोड बोलूया.. ©Abhijeet Jagtap "

मंत्रिपदाच्या चढा ओढीत गावच्या गुरा-ढोराकड थोड लक्ष राहुद्या.. स्वतःच घर भरण्यापेक्षा माणुसकीचा झरा वाईसा वाहुद्या.. दुष्काळाचे संकट डोकावता हवालदिल झाला माझा बळीराजा, अन्नदात्याचे रक्षण करण्या साथ सगळी देऊया.. खुर्चीसाठी भांडत बसण्यापेक्षा दुष्काळा वर थोड बोलूया.. असता मुबलक पाणी किंमत नाही मनी पाऊस पडता लांबणीवर तांडव राहतो कुनब्याच्या घरी.. ना कोणाचे ना कोणा पडले स्वतः च धोतर सावरून काई एक पसार झाले.. एकमेकांची जिरवण्यापेक्षा पाणी थोड जिरवूया.. आप्तजनात भांडत बसण्यापेक्षा .. दुष्काळावर थोड बोलूया.. दुष्काळावर मात करून मातीतून सोन पिकवल असत , अन् तिशी ओलांडलेल्या बंड्याच माझ्या दोनाच चार केलं असत.. शेतकरी म्हणून डावलेल्या पोरींना कष्टाच्या कमाई ने सोन्या चांदीने मढवल असत.. सुखाची पहाट बघण्यासाठी पाणी नियोजनाची गाठ बांधूया.. हे माझ्या सवंगड्यानो दुष्काळावर थोड बोलूया.. ©Abhijeet Jagtap

#दुष्काळ#महाराष्ट्र #Drought #MaharashtraPolitics #maharashtra #village

People who shared love close

More like this

Trending Topic