तुझ्याईतके जवळ माझ्या कोणीच नाही  तुझ्याईतके मनात | मराठी कविता

"तुझ्याईतके जवळ माझ्या कोणीच नाही  तुझ्याईतके मनात माझ्या कोणीच नाही  तू आहेस दूर केवळ शरीराने बरं का ! तुझ्याईतके ध्यानात माझ्या कोणीच नाही. तुला पाहतो वेड्यासारखा त्या चंद्रात सखे चांदण्यात मी तुला शोधतो वेगळे काहीच नाही  भावनेचा संबंध माझ्या तुझ्या दिशेने असतो वेदणेतही तूच असतेस दुसरे कोणीच नाही. सुखाची बाराखडी माझी तुझ्यात पूर्ण होते दुःखात तुझी साथ हवी दुसरे काहीच नाही तुझ्यात पूर्ण होते सखे या वेड्याची कथा तुझ्यात माझी कविता रंगते बाकी कशात नाही. साजरी करावी वेदना कशात अन कशी ? तुझ्या स्वरात आहे औषध बाकी कशात नाही विझले विस्तव मनातले तुझ्या संगतीत सखे तुझ्या प्रतिमेत आहे सगळे बाकी कशात नाही.                                  दिपक कोळसकर ©Dipak kolaskar"

 तुझ्याईतके जवळ माझ्या कोणीच नाही 
तुझ्याईतके मनात माझ्या कोणीच नाही 

तू आहेस दूर केवळ शरीराने बरं का !
तुझ्याईतके ध्यानात माझ्या कोणीच नाही.

तुला पाहतो वेड्यासारखा त्या चंद्रात सखे
चांदण्यात मी तुला शोधतो वेगळे काहीच नाही 

भावनेचा संबंध माझ्या तुझ्या दिशेने असतो
वेदणेतही तूच असतेस दुसरे कोणीच नाही.

सुखाची बाराखडी माझी तुझ्यात पूर्ण होते
दुःखात तुझी साथ हवी दुसरे काहीच नाही

तुझ्यात पूर्ण होते सखे या वेड्याची कथा
तुझ्यात माझी कविता रंगते बाकी कशात नाही.

साजरी करावी वेदना कशात अन कशी ?
तुझ्या स्वरात आहे औषध बाकी कशात नाही

विझले विस्तव मनातले तुझ्या संगतीत सखे
तुझ्या प्रतिमेत आहे सगळे बाकी कशात नाही.

                                 दिपक कोळसकर

©Dipak kolaskar

तुझ्याईतके जवळ माझ्या कोणीच नाही  तुझ्याईतके मनात माझ्या कोणीच नाही  तू आहेस दूर केवळ शरीराने बरं का ! तुझ्याईतके ध्यानात माझ्या कोणीच नाही. तुला पाहतो वेड्यासारखा त्या चंद्रात सखे चांदण्यात मी तुला शोधतो वेगळे काहीच नाही  भावनेचा संबंध माझ्या तुझ्या दिशेने असतो वेदणेतही तूच असतेस दुसरे कोणीच नाही. सुखाची बाराखडी माझी तुझ्यात पूर्ण होते दुःखात तुझी साथ हवी दुसरे काहीच नाही तुझ्यात पूर्ण होते सखे या वेड्याची कथा तुझ्यात माझी कविता रंगते बाकी कशात नाही. साजरी करावी वेदना कशात अन कशी ? तुझ्या स्वरात आहे औषध बाकी कशात नाही विझले विस्तव मनातले तुझ्या संगतीत सखे तुझ्या प्रतिमेत आहे सगळे बाकी कशात नाही.                                  दिपक कोळसकर ©Dipak kolaskar

#Heart

People who shared love close

More like this

Trending Topic