एक होती इर्शाळवाडी..
कोणी सिनेमा बघण्यात
कोणी उद्याच्या तयारीत,
आई लेकरात,मित्र मित्रात,
कोणी प्रणयात तर कोणी
गहन स्वप्नांत गुंग होते..!
रात्रीचे अकरा वाजले होते
सर्वजण आपापले कामे
आटपून नेमकेच सावरायला
लागले होते..!
डोंगराची आजवरची
माया कोरडी झाली
दरड कालपर्यंत शोभून
दिसायची,
आज मात्र रागाने लाल झाली होती,
तिचा अहंभाव जागा झाला होता,
ती कोसळली आणि
भयाण रात्रीत बेचिराख
केल्या अनेक कथा..!
स्वप्न थांबले,हसू रुसले,
गाणे संपले,
आकांत वाढत होता.
वाचवा वाचवा चा सूर
सर्वदूर गुंजत होता...!
©आदर्श....✍️
#Barsaat