हक्काची लढाई
नाव वागळण्या आधी एकदा
शेतकऱ्याच्या जागेवर उभे राहून बघा...
शेती करण एवढ सोप नसतं
जसा दिला जातो सत्तेसाठी दगा..
न्याय हक्कासाठी फोडला जातो टाहो
घेतली जाते फाशी
लेकर मरतात आमचे उपाशी
तरी देखील कोरड्या आश्वासनांचा
अभिशाप असतो आमच्या पाठीशी
सांगा कधी पर्यंत लाचारी
स्विकारायची आम्ही
आणि याच लाचारीच्या
नावाखाली गुवाहाटी फिरायची तुम्ही...
हक्काची लढाई,आता बरोबर झाली पाहिजे...
तुम्ही सत्तेचे वलय मिळवले
आम्हाला पिक विमा मिळालाच पाहिजे...
कवी - रविंद्र मधुकर घुमरे
मो.९८६०३३७२८४
©रविंद्र
#अग्रीम द्या..
#विमा द्या..