धुमसत राहतोय राग सतत तुझ्या मनात, फुंकर नको घालू | मराठी Poetry

"धुमसत राहतोय राग सतत तुझ्या मनात, फुंकर नको घालू त्याला फुलवू नकोस अंगार.. घे दीर्घ श्वास, हो थोडी निवांत, कर अस काही तरी जे करेल तुझं मन शांत.. मार एक चक्कर, घे ना एक गिरकी, नाकावरच्या रागाला हळूच मार टिचकी.. वाच एक पुस्तक, लिही चार ओळी, रेखाट एक चित्र नाहीतर सुबक रांगोळी.. आज चार पावलं जास्त चाल, अन पुरव थोडे जिभेचे लाड.. एकटीनेच घालव तू दिवस आजचा, तुझ्याच हातात आहे मार्ग सुखाचा.. - राजेश्वरी ©Rajeshwari Ghume"

 धुमसत राहतोय राग 
सतत तुझ्या मनात, 
फुंकर नको घालू त्याला 
फुलवू नकोस अंगार..
घे दीर्घ श्वास,  
हो थोडी निवांत, 
कर अस काही तरी 
जे करेल तुझं मन शांत..
मार एक चक्कर, 
घे ना एक गिरकी,
नाकावरच्या रागाला 
हळूच मार टिचकी..
वाच एक पुस्तक, 
लिही चार ओळी, 
रेखाट एक चित्र
नाहीतर  सुबक रांगोळी..
आज चार पावलं 
जास्त चाल, 
अन पुरव थोडे 
जिभेचे लाड..
एकटीनेच घालव 
तू दिवस आजचा,
तुझ्याच हातात 
आहे मार्ग सुखाचा..
- राजेश्वरी

©Rajeshwari Ghume

धुमसत राहतोय राग सतत तुझ्या मनात, फुंकर नको घालू त्याला फुलवू नकोस अंगार.. घे दीर्घ श्वास, हो थोडी निवांत, कर अस काही तरी जे करेल तुझं मन शांत.. मार एक चक्कर, घे ना एक गिरकी, नाकावरच्या रागाला हळूच मार टिचकी.. वाच एक पुस्तक, लिही चार ओळी, रेखाट एक चित्र नाहीतर सुबक रांगोळी.. आज चार पावलं जास्त चाल, अन पुरव थोडे जिभेचे लाड.. एकटीनेच घालव तू दिवस आजचा, तुझ्याच हातात आहे मार्ग सुखाचा.. - राजेश्वरी ©Rajeshwari Ghume

#relaxation

People who shared love close

More like this

Trending Topic