White माझा मी...
वाट तशी अनोळखी होती
म्हणून तर चुकलो मी,
स्वतःला लक्ख प्रकाशात पाहत होतो
खरंतर अंधारात रुतून बसलो मी.
जुन्या पाऊलखुणाची जाणीव होती
तरीही वाट शोधत बसलो मी,
ऋतुही बदलत चालले होते
सोनेरी पावसाची वाट पहिली मी,
जगलेले आनंदाचे क्षण
त्यांनाच तेवढे वेचतो मी,
समोरच्याचा तरी काय दोष
नशिब फाटक असं मानतो मी.
झालेल्या गोष्टींचा विचार कशाला
स्वतःच समाधान स्वतःच करतो मी,
मिळाले दुःख उंबरट्यावरच
त्यालाच कवटाळून रडतो मी.
पुन्हा एकदा याच वळणावर
एकटाच पाय रुतवून बसलोय मी,
स्वप्नाची बुडत चाललेली धावती
नाव स्वतःच बुडताना पाहतोय मी.
काय दिल असेल प्रेमाने
याचाच विचार करतोय मी,
सुख दुःख चं समाधान शब्दात मांडून
स्वतःला सावरतोय माझा मी.
माझा मीच...
Pandhari Varpe
8698361992
©Varpe Pandhari
#good_night