"क्षणात बदलते ते आयुष्य
कधी अचानक सुख देऊन जाते
कधी अचानक होत्याचे नव्हते होते ते आयुष्य
जिथे सर्व सुटत जाते
कधीतरी न मागताही खूप भेटते ते आयुष्य
जगणं म्हणून जगले जाते
कधीतरी जगण्यास एक कारण पुरेसे ठरते ते आयुष्य
कोणत्याच क्षणांची कल्पना नसते
नको म्हटले तरी जगावे वाटते ते आयुष्य
प्रत्येक गोष्टीत एक आशा असते
तीच जगण्याची ताकद बनते तेच आयुष्य !
©शब्दवर्षा
"